फोनिक्‍स, फ्लायर्स इलेव्हन, डीकेजी वॉरियर्स बाद फेरीत 

पाचवी प्रोमोड करंडक आंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धा 
प्रभात वृत्तसेवा 
पुणे, दि. 28 – फोनिक्‍स्‌ फ्लायर्स इलेव्हन व डीकेजी वॉरियर्स या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना पाचव्या प्रोमोड करंडक आंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. “आयसीएआय’च्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कटारिया हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रुद्रांग बेलसरे याने केलेल्या 57 धावांच्या जोरावर फोनिक्‍स्‌ फ्लायर्स इलेव्हन संघाने व्हीकेजी स्मॅशर्स इलेव्हन संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हीकेजी स्मॅशर्स इलेव्हन संघाने 8 षटकात 8 गडी बाद 76 धावा केल्या. यामध्ये चंकित धनुका याने सर्वाधिक 31 धावा केल्या. हे आव्हान फोनिक्‍स्‌ फ्लायर्स इलेव्हन संघाने 7.4 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. रुद्रांग बेलसरे (57) व मकरंद पेंडसे (10) यांनी संघाला महत्वपूर्ण धावा करून सहज विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात डीकेजी वॉरियर्स इलेव्हन संघाने बिस्मार्ट संघाचा 17 धावांनी पराभव करून बाद फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना वॉरियर्स संघाने 8 षटकात 2 गडी बाद 113 धावा केल्या. निपुण भंडारी याने सर्वाधिक 57 धावा तर, गुंजन बोथरा याने 43 धावा करून संघाला 100 धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना बीस्मार्ट इलेव्हन संघाचा डाव 8 षटकात 3 गडी बाद 96 धावांवर संपुष्टात आला. किशन जैन याच्या 41 धावा संघाचा पराभव वाचवू शकल्या नाहीत. अन्य सामन्यांत रॉयल्स्‌ इलेव्हन, स्टॅलन इलेव्हन, फिनप्रो ऐसेस, कीर्तने पंडित इलेव्हन, सीए चॅलेंजर्स व केजी टायटन्स या संघांनीही आपापल्या गटातून बाद फेरीमध्ये प्रवेश केला.

सविस्तर निकाल – 
गटसाखळी फेरी – 1) व्हीकेजी स्मॅशर्स इलेव्हन – 8 षटकांत 8 गडी बाद 76 धावा (चंकित धनुका 31 (12, 5 षटकार), आकाश भाटेवरा 10, शालवा कर्वे 3-12, रुद्रांग बेलसरे 1-12) पराभूत वि. फोनिक्‍स्‌ फ्लायर्स इलेव्हन – 7.4 षटकांत 3 गडी बाद 82 धावा (रुद्रांग बेलसरे 57 (27, 3 चौकार, 4 षटकार), मकरंद पेंडसे 10, कुशाल जैन 1-12).
2) डीकेजी वॉरियर्स इलेव्हन – 8 षटकांत 2 गडी बाद 113 धावा (निपुण भंडारी 57 (16, 3 चौकार, 2 षटकार), गुंजन बोथरा 43 (27, 5 चौकार, 1 षटकार), दिवकेश उनकड 2-18) वि.वि. बीस्मार्ट इलेव्हन – 8 षटकांत 3 गडी बाद 96 धावा (किशन जैन 41 (17, 1 चौकार, 1 षटकार), अमोल चंगेडिया 29 (18, 1 चौकार, 2 षटकार), निकेश शर्मा 2-15).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)