फोनवर बोलताना पुलावरुन पडून तरुणाचा मृत्यू

चेन्नई विमानतळावर सकाळी साडेसहाच्या सुमारास आयटीत काम करणाऱ्या व्यक्तीचा पुलावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये. ३२ वर्षीय चैतन्य वुयुरु असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथे राहणारी होती. फोनवर बोलताना ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार विमानतळावरील डोमेस्टिक टर्मिनलच्या गेट नंबर  ४ जवळ ही घटना घडली. पुलावर उभा  राहून फोनवर बोलत असताना चैतन्यचा पाय घरला आणि तो खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही आत्महत्या होती की अपघात याचा तपास केला जात आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाची उंची जमिनीपासून ३० फूट इतकी होती. पुलावरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू  झाला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)