#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात

अग्रगण्य कुस्तीगीर विनेश फोगाट गुरुवारी सोमवीर राठी याच्यासोबत बलाली येथे विवाह बंधनात अडकली. या विवाहसोहळ्याला कुस्तीगीर साक्षी मलिक, कुस्तीगीर सुशील कुमार, भालाफेक अथलॅटिक नीरज चोप्रा, खासदार दुष्यांत चौटालांसह अनेक बडे राजकीय नेते उपस्थित होते.

विनेश फोगाट आणि सोमवीर राठी यांचा विवाह खास वेगळ्या कारणासाठी चर्चेचा विषय बनला आहे. विनेश फोगाट-सोमवीर राठी यांनी लग्नात सात फेरेऐवजी आठ फेरे घेतले. आठव्या फेऱ्यामध्ये त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची शपथ घेतली. दरम्यान, विनेश फोगाटने ऑगस्ट महिन्यात आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली. विनेश आणि सोमवीर दोघेही रेल्वेत नोकरी करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)