#फोटो : रंगावलीतून नौदलाला मानवंदना

पुणे – भव्य अशी 20 बाय 30 फूट रांगोळीतून साकारण्यात आलेले भारतीय नौदलाचे बोधचिन्ह आणि शालेय मुलांनी हातात तिरंगी झेंडे घेऊन भारतीय नौदलाला दिलेली मानवंदना तसेच यावेळी दिलेल्या भारत माता की जय… वंदे मातरम्‌… च्या घोषणांनी मराठी शाळेचा परिसर दणाणला होता. निमित्त होते, नौदल कृतज्ञता सोहळ्याचे.

देशभरात सुरू असलेल्या सेवा, त्याग आणि कर्तव्य सप्ताहाचे औचित्य साधून भारतीय नौदल दिनानिमित्त अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी शाळेमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई, माजी आमदार मोहन जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सामाजिक कार्यकर्ते पीयुष शहा आदी उपस्थित होते. राष्ट्रीय कला अकादमी आणि अमर लांडे यांसह सहकलाकारांनी ही रंगावली साकारली.

प्रभुदेसाई म्हणाल्या, देशासाठी आयुष्य देणे, हा सर्वोच्च त्याग आहे. भारतीय नौदल इ. स. 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या रॉयल इंडियन नेव्ही (आरआयएन) पासून सुरू झाले. इ. स. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळविणे सुकर झाले. त्यामुळे हा दिन नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

जोशी म्हणाले, भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे युद्धनौकांचा ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग आदी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानाच्या तुकड्या आहेत. आय. एन. एस. विराट, डेली क्‍लास, त्रिशूळ, संकुश पाणबुडी असे महत्त्वपूर्ण भाग असलेल्या भारतीय नौदलातील सैनिकांनी प्रत्येकाने मानवंदना द्यायला हवी.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)