#फोटो : दीपवीर रिसेप्शनसाठी बंगळुरूला रवाना

बॉलीवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा १४-१५ नोव्हेंबरला इटलीत शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता रिसेप्शनसाठी बंगळुरूला रवाना झाले आहेत. २१ नोव्हेंबर म्हणजेच उद्या बंगळुरूतील लीला पॅलेसमध्ये दीपवीरचे रिसेप्शन होणार आहे. रणवीर-दीपिका मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी दीपिकाने सब्यसाचीने डिझाईन केलेला ऑफव्हाईट अनारकली ड्रेस घातला होता. तर रणवीरनेही पांढरा कुर्ता व नेहरू जॅकेट घातले होते. बंगळुरूमध्ये होणाऱ्या रिसेप्शनमध्येही दोन्ही कुटुंबांचे खास नातेवाईक आणि मित्र परिवार असणार आहे.

बंगळूरूवरून आल्यावर २८ नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांनी वरळीतील नव्या घरी दीपिका-रणवीर शिफ्ट होणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)