#फोटो : दांडी येथील मीठ सत्याग्रह स्मारकाचे पंतप्रधान करणार लोकार्पण

सुरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरामधील सुरत आणि नवसारी दौरा करणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. याआधी सुरत विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.

नवसारी जिल्ह्याच्या दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. या स्मारकात महात्मा गांधी यांच्यासह दांडी यात्रेत सहभागी झालेल्या ८० सत्याग्रहींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय या स्मारकात ऐतिहासिक दांडी यात्रेचे वर्णन करणारे २४ भित्तीशिल्प लावण्यात आलेली आहेत. पंतप्रधान या स्मारकाला भेट दिल्यावर जनतेशी संवाद साधतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात १९३० साली झालेल्या दांडी यात्रेचे विशेष महत्त्व आहे. या यात्रेपासूनच महात्मा गांधी यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. साबरमती आश्रमापासून दांडी येथे २४१ मैलांचा प्रवास करून महात्मा गांधी यांनी समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलले होते. ब्रिटीश सरकारने मीठावर लावलेल्या कराचा निषेध करणारा हा प्रतिकात्मक मोर्चा स्वातंत्र्य लढ्यात मैलाचा दगड ठरला.

दरम्यान, मागील १५ दिवसात  गुजरात दौरा असून याआधी ते ‘व्हायब्रण्ट गुजरात’ कार्यक्रमात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)