#फोटो : अखेर दीपवीरच्या लग्नाचे फोटो शेअर; लाईक्‍सचा पाऊस

इटली – बॉलिवूडमधील बहुचर्चित “लव्हबर्ड’ जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे दाम्पत्य लेक कोमो येथे बुधवारी कोकणी पद्धतीने लग्नबंधनात अडकले. तर गुरुवारी सिंधी पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. या कपलच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आसूसले होते. अखेर लग्नाचे फोटो शेअर होताच अक्षरशः लाईक्‍सचा पाऊस पडला. पहिल्या 20 मिनिटांतच सहा लाखांवर लाईक्‍स केले.

या विवाहसमारंभाला अत्यंत निकटचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचीच उपस्थिती होती. दोन्ही बाजूचे मिळून केवळ 40 जण या समारंभाला साक्षीदार होते, असे समजते आहे. दीपिका कोंकणी आणि रणवीर सिंधी दोन्ही पद्धतीने विवाह पार पडला.

रणवीर आणि दीपिका यांनी यापूर्वी “राम लीला’, “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्‌मावत’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. तेंव्हापासूनच यांची “लव्हस्टोरी’ चर्चा होत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)