#फोटोज: पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक बड्या नेत्यांनी साजरे केले रक्षाबंधन

आज रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची रक्षाबंधनाचा सण साजरा करतानाची काही क्षणचित्रे…

आज रक्षाबंधनाचा पवित्र सण राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी दिल्ली मधील शाळकरी मुलींसोबत साजरा केला
आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधताना चिमुकल्या
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले
पटणा येथे रक्षाबंधना निमित्ताने राजधानी वाटिका येथे बिहार बारिश सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला, यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी झाडाला राखी बांधत झाडांचे रक्षण करण्याचा संदेश दिला . 
भुवनेश्वर येथे रक्षाबंधना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शाळकरी मुली ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना राखी बांधताना
रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महिला झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना राखी बांधताना
 आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना राखी बांधताना लहानगी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)