“फोटोग्राफ’मध्ये झळकणार नवाजुद्दीन-सान्याची जोडी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रितेश बत्रा यांच्या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राची जोडी झळकणार आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या “बधाई हो’ चित्रपटानंतर सान्या मल्होत्रा या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीची भूमिका साकारत आहे. जी अभ्यासात अव्वल असते.

या चित्रपटाचा पहिला टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा हे एका सुनसान रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहे. तसेच पोस्टरवर एक ओळ दिसून येत आहे, ज्यावर लिहिले आहे की, “यह सब एक… फोटोग्राफ के साथ शुरू हुआ।’ दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी चित्रपटाचे पहिले भारतीय पोस्टर आपल्या ट्‌विटर अकाउंट शेअर केले करत ट्‌विट केले की

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, “लंचबॉक्‍स’च्या घवघवीत यशानंतर रितेश बत्रा हे मुंबईतील धारावीमधील “फोटोग्राफ’ सादर करण्याच्या तयारीत आहेत. रितेश बत्रासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी दुस-यांदा काम करत आहे. तर सान्या मल्होत्रा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो सनडांस चित्रपट महोत्सवात होणार आहे. तसेच बर्लिन चित्रपट महोत्सवात युरोपीय प्रीमियर शो होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)