फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत पीसीसीओईची हॅट्रिक

निगडी – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या मारुती सुझुकी एसएई सुप्रा इंडिया 2018 ‘ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली.

बुद्ध इंटरनॅशनल सर्किट नवी दिल्ली ग्रेटर नोएडा फॉर्म्युला रेसिंग ट्रॅक येथे झालेल्या सातव्या मारुती सुझूकी एसएई सुप्रा इंडिया 2018 स्पर्धेत यावर्षी देशभरातून आयआयटी, एनआयटी सह 126 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करुन पीसीसीओई च्या यांत्रिकी विभागाच्या टिम क्रेटॉस रेसींग टीमने ओव्हर ऑल गटात प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे पारितोषिक, इंजिनिअरींग डिझाईन गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरींग गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजारांचे पारितोषिक, इंजिनिअरींग एक्‍सलंस गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, स्किड पॅड गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक, ऑटो क्रॉस गटात प्रथम क्रमांकाचे तीस हजाराचे पारितोषिक अशी एकूण चार लाख 80 हजार रुपयांची सात पारितोषिके पटकाविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2016 व 17 मध्ये सुध्दा पीसीसीओईने प्रथम क्रमांक पटकाविला होता, या वर्षी सुध्दा प्रथम येवून संपूर्ण भारतामध्ये सलग तिस-यांदा प्रथम येण्याचा विक्रम पीसीसीओईने हॅट्रिक केली आहे. या टिममध्ये कुशल ढोकरे (कॅप्टन), प्रतिक वायकर, अभिषेक पाटील, प्रफुल्ल भोसले, सुबोध म्हसे, विरेंद्र निचित, राघवेंद्र मानिकवार, शुभांग डिगे, मोहित मारु, शिवकुमार मिरजगावे, परम देसाई, शुभम पाटील, प्रभंजन शेळके, ऋषिकेश कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, गोपाल काब्रा, आदित्य पाटील, तेजस कराड, रौनक गुप्ता, राहुल औताडे, सर्वेश देशमुख, राहुल कन्नावर, श्रेयश पदमावार, आकाश नांदिर्गी, आहम मेमन, संकेत कामत, नैनेश देसले, शांतनू दाहसकर, मोहनिश पोटू, आकाश शिंदे, पुरुषोत्तम दोशी, निरंजन तारले, साहिमान देशमुख, कृष्णाई मुंढे, पुजा नरवाडे, समाधान दोर्गे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. अमोल सुर्यवंशी व प्रा. निलेश गायकवाड हे टिम क्रेटॉस रेसिंगचे फॅकल्टी ऍडव्हाईजर म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहेत. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर व यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र देवरे यांचे मार्गदर्शन मिळाले .

पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई व प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर, प्राचार्य हरिष तिवारी, प्रा. डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)