फैजाबादचेही नाव बदलून  ‘श्री अयोध्या’ ठेवा ; विश्‍व हिंदु परिषदेची मागणी 

लखनौ: राज्य सरकारने अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे केले आहे त्याचे विश्‍व हिंदु परिषदेने स्वागत केले आहे पण आता राज्य सरकारने याच आधारावर फैजाबादचे नामांतर करून त्या शहराला श्री अयोध्या असे नाव द्यावे अशी मागणी या संघटनेने केली आहे.

विश्‍व हिंदु परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की अलाहाबाद हे नाव गुलामगिरीचे प्रतिक होते. त्यामुळे या शहराचे नाव बदलण्याचा राज्य सरकारचा निर्णय रास्त होता आणि त्याचे सर्वच गटातील लोकांनी स्वागत केले आहे. जनभावना लक्षात घेऊन काही महत्वाचे निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा हा मानस स्वागतार्ह आहे असेही त्यांनी नमूद केले. आता त्यांनी याच आधारावर फैजाबादचे नाव श्री अयोध्या असे ठेवावे अशी मागणी त्यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की ब्रिटीाशांपासून आम्हाला मुक्ती मिळाली पण हिंदुंच्या भावना मात्र कायमच दुर्लक्षित होत राहिल्या आहेत. येत्या दिवाळीत योगी सरकार फैजाबादचे नामकरण करून सर्व हिंदु साधुसंताना खूष करणारा निर्णय घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)