फेसबूकद्वारे युवकाला तीन लाखांचा गंडा

पिंपरी – बनावट फोटो आणि नाव वापरून एका बहाद्दराने आई आजारी असून तिची किडनी बदलायची आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून एका युवकाकडून तीन लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.

साहिल राजेशकुमार गुप्ता (वय-32, रा. कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव. मूळ रा. बी. जे. एन्क्‍लेव, चंदिगढ) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद असून विनोदकुमार मेंदीरत्ता (रा. मारुती विहार, चक्करपूर, फारुखनगर, गुरगाव, हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल यांचा रमन सोंख्ला हा मित्र आहे. त्याचा फोटो आणि नाव वापरून आरोपी विनोदकुमार याने एक बनावट फेसबूक प्रोफाइल तयार केले. त्याद्वारे त्याने फेसबूक मेसेंजरमधून फिर्यादी साहिल यांना मेसेज केला. त्यात त्याची आई आजारी आहे. त्यांची किडनी खराब झाली आहे. किडनी बदलायची आहे. यासाठी खूप खर्च येणार असून बाकीची रक्कम मी जमा केली असून चार लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही पैसे देऊ शकाल का? असे म्हटले.

साहिल यांनी मित्राची आई आजारी असून मित्र अडचणीत असल्याने त्याला मदत करायचे ठरवले. त्यानुसार साहिल यांनी त्यांच्या बॅंक खात्यातून आरोपीच्या बॅंक खात्यात तीन लाख रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर संबंधित मित्राशी त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच साहिल यांनी तात्काळ सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)