फेसबुक मित्राकडून महिलेचा विनयभंग

पिंपरी – फेसबुक मित्राने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना वाकडमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहित तरुणीने तक्रार दिली असून पोलिसांनी किरण तौरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुणीची बीडमध्ये राहणाऱ्या किरण तौर या तरुणाशी तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढली. किरण तिला भेटण्यासाठी बीडवरून पुण्यात यायचा. परंतु, या दरम्यान तक्रारदार तरुणीचे लग्न ठरले.

तिने किरणला याची कल्पनाही दिली. मात्र त्याला हा प्रकार सहन झाला नाही. त्याने फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍपवरून फिर्यादीला मानसिक त्रास देणे सुरू केले. तिच्या पतीसह सासरच्यांना फोन करून धमकी द्यायला सुरुवात केली. अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. वाकड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)