फेसबुक दिंडीची यंदा “नेत्रवारी’

आषाढी वारीत देणार नेत्रदानाचा संदेश

कल्याणी वाघमारे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे, – आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी वारी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गेल्या 8 वर्षांपासून “फेसबुक दिंडी’ करत आहे. फोटो,लाइव्ह व्हिडियोच्या माध्यमातून वारी लोकांपर्यंत पोहचवित असताना ती अधिकाधिक लोकोपयोगी कशी होईल, यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध संकल्पना घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. यावर्षी फेसबुक दिंडी “नेत्रदान’ ही नवी संकल्पना घेऊन सोहळ्यात सहभागी होणार आहे.

फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे म्हणाले, यावर्षी जगद्‌गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 333 वे वर्ष आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासच दर्शन घडवणारी एक महान परंपरा. या परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती-धर्मांना, पंथांना सामावून घेतले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी वारी “याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासारखे सुख दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. म्हणूनच “पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा, पाहीन मी याचि देही, याचि डोळा’ असे म्हणत आजही लाखो वारकरी पंढरपूरपर्यंत चालत जातात. ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सामील होता येत नाही, असे लाखो “e- वारकरी’ आपल्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळवतात. पण आजही आपल्याच समाजातील आपले अंध बांधव हा सुख-सोहळा पाहाण्यापासून वंचित आहेत. त्यांना ही वारी कशी दाखवू शकतो, या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाला आहे. म्हणूनच फेसबुक दिंडी यावर्षी “नेत्रवारी’ अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करत आहे.

‘आतापर्यंत 800 लोकांनी मरणोत्तर नेत्रदानासाठी नावनोंदणी केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधूनही नावनोंदणी झाली आहे. नेत्रदानासाठी नावनोंदणी केलेल्यांची माहिती महाराष्ट्रातील नेत्रपिढीला देण्यात येणार आहे. त्यातून दृष्टीहिनांना दृष्टी देण्याचा आमचा प्रयत्न आहे’.
– स्वप्नील मोरे, संस्थापक, फेसबुक दिंडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)