फेसबुक डेटा लिक प्रकरण; भारताने पाठवली नोटीस

नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून भारतीय नागरीकांची  माहिती चोरणार्‍या केंब्रिज अॅनालिटिक या राजकीय डेटा विश्‍लेषक कंपनीला भारत सरकारने नोटीस पाठविली आहे. यात सहा मुद्द्यांवर माहिती विचारण्यात आली आहे.

भारतीयांची माहिती मिळवणार्‍या दुसर्‍या कंपन्या कोणत्या?, भारतीयांची माहिती त्यांनी कशी मिळविली? माहिती घेण्यापूर्वी संबंधित युजरची परवानगी घेतली का?,माहितीपर्यंत कंपनी कशी पोहचली?, या माहितीच्या आधारे काही नवीन प्रोफाईल्स तयार करण्यात आल्या आहेत का?, माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वत:चा सहभाग आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे भारताने मागितली आहेत.  ही माहिती ३१ मार्चपर्यंत देण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत माहिती न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही या नोटीशीत देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)