फेसबुक डेटा लिक प्रकरण : केंब्रिज ऍनालिटीकाला केंद्र सरकारची नोटीस

नवी दिल्ली – फेसबुक युजर्स डेटा लिकप्रकरणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या केंब्रिज ऍनालिटीका या ब्रिटीश कंपनीला आज केंद्र सरकारने नोटीस बजावली. भारतीयांच्या डेटाचा गैरवापर केला का आणि त्यांच्या मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का, अशी विचारणा सरकारने कंपनीकडे केली आहे. कंपनीकडून 31 मार्चपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे.

अनेक देशांमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी फेसबुक डेटाचा गैरवापर केल्याचा आरोप केंब्रिज ऍनालिटीकावर आहे. भाजपने हे प्रकरण पुढे आल्यावर या कंपनीशी असलेल्या कथित संबंधांवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. याशिवाय, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डेटा चोरी करून भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा फेसबुकला दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)