फेसबुक डेटा लिक प्रकरण : केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचे कामकाज बंद

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लिक प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा चोरी करून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती. २०१६ मध्ये या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा जो विजय झाला त्याचे अप्रत्यक्ष श्रेय केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीलाही दिले गेले. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली होती. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझिल आणि मलेशियामध्ये आहेत. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)