फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक

मुंबई :फेसबुकच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही कारण  केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे कंपनी आधीपासूनच वादात आहे. तर आता व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी फेसबुक डिलीट करा, असे म्हटले आहे.

ब्रायन अॅक्टन यांनी ट्वीट केले आहे, “इट इज टाइम #deletefacebook.” अॅक्टन यांचे ट्विटर हॅण्डल व्हेरिफाईड नाही. त्यांचे सुमारे 23 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हे त्यांचे खासगी अकाऊंट आहे आणि ते कधीतरीच ट्वीट करतात हे फॉलोअर्सना माहित आहे. पण त्यांनी फेसबुक डिलीट करण्यास का सांगितले, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने जेन कॉम आणि ब्रायन अॅक्टन यांच्याकडून 2014 मध्ये 16 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं होतं. जेन कॉम अजूनही कंपनीसोबत काम करत असून, अॅक्टन यांनी स्वत:ची संस्था सुरु केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)