फेसबुकवर पर्रीकरांच्या मृत्यूची अफवा पसरवणारास गोव्यात अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी (गोवा) -गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूची फेसबुकवर खोटी माहिती देणाऱ्यास गोवा पोलीसांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्रीकर यांना कॅन्सर झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका पत्रकारास दोन महिन्यांपूर्वी गोवा पोलीसांनी अटक केली होती. पोटाच्या विकारामुळे पर्रीकर यांनी गोव्याव्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आले. त्यांना प्लीहेचा विकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वास्कोमधील केनेथ सिल्व्हेरा यांनी पर्रीकर यांच्या मृत्यूची खोटी माहिती फेसबुकवर टाकली होती. पर्रीकर यांचे निधन झाल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी फेसबुकवर शेयर केले होते. त्यानंतर ताबडतोब गोवा पोलीसांनी त्यांना अटक करून मॅजिस्ट्रेटृासमोर हजर केले. त्यांच्यावर कलम 505 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केनेथ सिल्व्हेरा यांनी मागील वर्षी मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात पणजी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)