फेसबुकवरून युवकांना दहशतवादी बनवणाऱ्या महिलेला काश्‍मीरमध्ये अटक

जम्मू – फेसबुकचा वापर करून काश्‍मिरी युवकांना दहशतवादाकडे वळवणाऱ्या महिलेला पोलीसांनी अटक केली आहे. शाजिया (30) नावाच्या या दहशतवादी महिलेला पोलीसांनी आज काश्‍मीरच्या नौगाम रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. तपासात तिने कबूल केले की, युवकांना दहशतवादी बनवण्यासाठी ती फेसबुकचा उपयोग करत असे, काश्‍मीर खोऱ्यातील अनेक युवक तिच्या जाळ्यात अडकून दहशतवादी बनलेले आहेत.

युवकांना दहशतवादाकडे बळवण्याबरोबरच शाजिया पोलीसांच्या हालचालींच्या बातम्यादहशतवाद्यांपर्यंत पोहचवण्याचेही काम करत असे. अनंतनाग जिह्यातील दोन युवकांना शाजियाने हत्त्यारे आणि दारूगोळा पुरवला होता असे तपासात उघड झाले आहे. या दोघांपैकी एकाला पोलीसांनी अटक केली आहे. उत्तर काश्‍मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सुंबल गावी राहणाऱ्या शाजियावर पोलीसांचे पूर्वीपासून लक्ष होते. आपल्या दहशतवादी कारवायांचा संशय येऊ नये म्हणून ती अनेकदा पोलीसांची मदत घेत असे.

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीसांना मदत करणार असल्याचे ती सांगत असली, तरी प्रत्यक्षात ती पोलीसंची माहिती दहशतवाद्यांना देत असे. शाजिया पोलीसांची एजंट असल्याचा व्हिडियो एकदा फेसबुकवर व्हायरल झाला होता. बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्‍मिरी युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचे काम शाजियाने हाती घेतले होते. आतापर्यंतच्या तपासात शाजियाने काही कमांडरांची नावे सांगण्यापलीकडे काहीही माहिती पोलीसांना दिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)