फेसबुकवरुन सेक्‍स रॅकेट चालवणाऱ्याला अटक

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना आली जाग
मुंबई – फेसबुकवर शिफु संकृती या नावाने पेज चालवून सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या सुनील कुलकर्णी या बोगस डॉक्‍टरला मालाड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाच्या आदेशानंतर जागे झालेल्या पोलिसांनी शिफु संकृती नावाने बीभत्स विचारांचा प्रसार करणाऱ्या कुलकर्णीकडून सेक्‍स विषयक पुस्तके, सीडी आणि औषधे जप्त केली आहेत. या प्रकाराने तरुण पिढीच बरबाद करणारी विकृती उघडकीस आली आहे.

शिफु संकृतीच्या फेसबुकच्या माध्यमातून या आरोपीने अनेक तरुण-तरुणींना आकर्षित करुन जाळ्यात ओढले. त्यांना हा बोगस डॉक्‍टर अंमली पदार्थ सेवन करायला द्यायचा. तर तरुणींना वेश्‍याव्यसाय करण्यासाठी प्रवृत्त करत असे, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकारे त्याने 2 बहिणींना जाळ्यात ओढले होते. यामुळे त्यांच्या पालकांनी मालाड पोलिसात तक्रार दिली. तरीही पोलिसांनी केवळ गप्प बसण्याची भूमिका वठविली. यामुळे हतबल झालेल्या त्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सेक्‍सरॅकेट चालविणाऱ्या बोगस डॉक्‍टर सुनीलवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या आदेशाने पोलिसांचे धाबे दणाणले आणि गुरुवारी पहाटेच पोलिसांनी खार येथील त्याच्या राहत्या घरून अटक केली.

शिफु संकृती हे सुनील कुलकर्णीचे फेसबुक पेज आहे. यामध्ये सेक्‍स विषयक माहिती असून याबद्दल कार्यशाळा आयोजित केल्या जात होत्या. पेज लाईक करणाऱ्यांना तो कार्यशाळेत सहभागी होण्याचा संदेश पाठवित असे. मानसिक तणावात असलेले तरुण -तरुणी याप्रकारात सहज फसले जात होते. त्यानंतर त्या विकृतीला ते बळी पडत अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)