फेसबुकला आणखी एक धक्का; टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट!

नवी दिल्ली: केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे अडचणीत आलेल्या फेसबुकला आणखी एक धक्का बसला आहे. अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे लाखो लाईक्स असलेले फेसबुक पेज डिलीट केले आहेत. टेस्ला ही इलेक्ट्रीक कार तयार करणारी नामांकित कंपनी आहे.

एलन मस्क यांना फेसबुक पेज डिलीट करण्याचे आव्हान देण्यात आले होते. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि स्पेक्स एक्स, टेस्ला ही पेजस डिलीट केली. यापूर्वी व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनीही फेसबुक डिलीट करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले होते. त्यानंतर एलन मस्क यांनी थेट कृती केल्याने, हळूहळू फेसबुक आपला विश्वास गमावत आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

SpaceX  या फेसबुक पेजला जवळपास 26 लाख लाईक्स होते, तर Tesla फेसबुक पेजलाही जवळपास तितकेच म्हणजेच 24 लाख लाईक्स होते.  लाईक्सची एव्हढी मोठी संख्या असणारी ही दोन पेज आता लॉगआऊट करण्यात आली आहेत. मात्र एलन मस्क यांचं वैयक्तिक मात्र अनधिकृत पेज अजूनही सुरु असल्याचे दिसते. त्यांच्या नावे अनेक फेसबुक पेज आहेत, त्यातील अनेक बनावटही आहेत. दरम्यान, सध्या ट्विटरवर #deletefacebook हा ट्रेण्ड सुरु आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपच्या सहसंस्थापकानंतर आता टेस्लाच्या सीईओंनी सहभाग नोंदवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)