फेसबुकच्या शेअरची घसरण

फेसबुकवरील माहितीच्या दुरुपयोगाचा परिणाम

वॉशिंग्टन-फेसबुकवरून वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेल्याने या सोशल मीडियाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत चांगलीच घसरण झाली. गेल्या आठवडयात फेसबुकवरील माहितीचा वापर अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर कंपनीच्या समभागात घसरण झाली. झुकरबर्ग यांच्या वैयक्‍तिक संपत्तीत तब्बल 53 हजार कोटी रुपयांनी घट झाली. झुकरबर्ग यांनी या प्रकरणाबद्दल माफी मागितल्यानंतरही समभागांची विक्री सुरूच आहे.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार सोमवारी झुकरबर्ग यांची संपत्ती 75.3 अब्ज डॉलर्स होती. ती आता घसरण साधारण 67.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. गेल्या पाच दिवसांत त्यांच्या संपत्तीमध्ये 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 53 हजार कोटी रुपयांनी घसरली. प्रतिदिनी त्यांची संपत्ती 10 हजार डॉलर्सने कमी झाली. झुकरबर्ग यांनी 8 वर्षात संपत्ती कमविली होती, तेवढी केवळ पाच दिवसांत गमाविली. कंपनीचा समभाग डाऊ जोन्समध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीचा समभाग 185 डॉलर्सवरून 164 वर पोहोचला. झुकरबर्ग यांच्याबरोबरच त्यांच्या गुंतवणूकदारांनाही बराच मोठा फटका बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)