फेसबुकच्या ओळखीतून महिलेची फसवणूक

पुणे – फेसबुकवर महिलेशी ओळख करत तीला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेली महिला वडगावशेरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमर सिंग, अश्‍फाक खान, अमिना खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वडगाव शेरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. दोन वर्षांपूर्वी अमिना खान नावाच्या महिलेने फिर्यादींना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अमिना खान हिने इंग्लडमध्ये राहत असल्याचे फिर्यादींना सांगितले होते.

-Ads-

यामाध्यामातून गेल्या दोन वर्षापासून फिर्यादी या तिच्या संपर्कात होत्या. त्याच्यात चांगली ओळख झाल्यानंतर अमिना खानने फिर्यादीला भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी 27 हजार रुपये ऑनलाइन मागून घेतले. त्यानंतर विमानतळावर भेटवस्तूचे पाकिट पाठवले आहे त्यात सोन्याचे दागिने असून ते सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडल्याचे सांगत ते पाकिट कस्टमच्या ताब्यातून सोडविण्यासाठी काही रक्कम भरावी लागणार असल्याचे फिर्यादीला सांगितले.

त्यानुसार फिर्यादीला अश्‍फाक खान, गुप्ता फॅब्रिक्‍स, अमर सिंग या नावाने असलेल्या दोन बॅंकांच्या खात्यात पैसे भरण्याची सूचना आरोपी अमिनाने केली होती. त्यानुसार फिर्यादीने पैसे भरले. मात्र, एकूण 3 लाख 2 हजार 200 रुपये भरुनदेखील भेटवस्तूंचे पाकीट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिकचा तपास येरवडा पोलीस करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)