फेसबुकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले

नवी दिल्ली : डेटा लिक प्रकरणानंतर फेसबुकची परिस्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर खाली घसरले आहेत. तर, दुसरीकडे फेसबुकवर सतत ऑनलाइन असणारे लोक आणि कंपन्या आपले पेज डिलीट करत आहेत. त्याचबरोबर, या कंपन्या फक्त आपले फेसबुकवरील पेज डिलीटच करत नाहीत तर फेसबुकच्या माध्यमातून दिल्या जाणा-या जाहिराती बंद करत आहेत.

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात फेसबुकच्या उत्पन्नात जवळपास 75 अब्ज यूएस डॉलर इतका तोटा झाला आहे. यामध्ये भारतीय रुपयांच्या आकडेवारीनुसार 4875 अरब रुपयांचा तोटा फेसबुकला गेल्या आठवड्यात झाला आहे आणि अद्यापही तोटा होत आहे. याचबरोबर, शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले आहेत. फेसबुकच्या एका शेअरची किंमत रविवारी फक्त 159.39 यूएस डॉलर इतकी होती.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये फेसबुकची अशाप्रकारची स्थिती 2012 मध्ये सुद्धा झाली नव्हती. त्यावेळी पण काही प्रमाणात घसरण झाली होती. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 1012 मध्ये न्यूयॉर्कमध्ये शेअरची किंमत 11 टक्कांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आतापर्यंत सर्वात खाली म्हणजेच 23.94 डॉलरवर घसरला होता. याचबरोबर, फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबुकवरील आपले पेज डिलीट करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)