फेसबुकचे डेटा चोरी रोखण्यासाठी उपाय 

नवी दिल्ली – फेसबुक हे समाजमाध्यम म्हणून जगभरामध्ये लोकप्रिय म्हणून ओळखण्यात येते. मागील काही महिन्यामध्ये डेटा चोरीच्या प्रश्‍नावरून फेसबुक चर्चेत राहिले होते. त्यानंतर काही काळ तणावात कंपनीचा कार्यकाळ चालू राहिला होता. अमेरिकेच्या निवडणुकीत या डेटा चोरीचा वापर करण्यात आल्याचाही आरोप कंपनीवरती करण्यात आले होते. त्यानंतर डेटा चोरीला आळा घालण्यासाठी कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करत डेटा चोरीसारखी समस्या भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी कंपनीकडून कारवाई करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आलेत. कंपनीने ऍप डिऍक्‍टिवेट करून ऍप काढून टाकले आहेत. दोन अब्ज वापरकर्त्याचा एक ऍप आहे.

सखोल पडताळणी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तपासणीच्या वेळी जवळ जवळ 200 ऍप डाटा चोरी करण्याच्या संशयावरून फेसबुककडून काढून टाकले आहेत. ही बाब विश्वास संपादन करुन प्रतिमा सुधारण्यास योग्य पाऊल उचलले आहे. फेसबुककडून जवळपास 8 कोटी वापरकर्त्याकडून डाटा चोरी करण्याचा प्रश्न उघडकीस आला होता. या कारणामुळे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग एका एका ऍपची तपासणीची सुरुवात करणार असल्यो सांगीतले होते. या पुढील काळात डेटा चोरी होणार नाही याची सर्वतोपरी काळजी फेसबुकमार्फत घेण्यात येईल, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो सत्यात उतरवण्यास आल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)