फेसबुकची चोरी कदापि खपवून घेणार नाही-रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली: अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक डेटा चोरी व लीक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद आता भारतात देखील उमटत असल्याचे दिसत आहे. कारण फेसबुकचा वापर करून भारतीय व्यक्तींच्या व्यक्तिगत माहितीची चोरी झाली असेल तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.

अमेरिकेमध्ये कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरुन आपल्या खासगी फायद्यासाठी विकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये भारतीय युजर्सचीही गोपनीय माहिती असल्याचे समजते.  याप्रकरणी भाजपाकडून काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे. काँग्रेसने केंब्रिज अॅनालॅटिका कंपनीला ही गोपनीय माहिती विकल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या माहितीच्या आधारे नायजेरिया, केनिया, ब्राझील आणि भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात आल्याचा दिंडोरा कंपनीकडून पिटला जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्ग यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, फेसबुकच्या माध्यमातून कोणत्याही भारतीय व्यक्तीची गोपनीय माहिती चोरीला गेली असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. देशाच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार तुम्हाला समन्स बजावण्याचे आणि सक्त कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)