फेरीवाल्यांचे लातुरात बेमुदत साखळी उपोषण

लातूर  : लातूर शहरातील अतिक्रमणं महापालिकेने उठवल्यानंतर शहरातील आंदोलनात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. आता शहरातील हातगाडा असोसिएशनच्यावतीने महानगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने राज्यात फेरीवाला धोरण निश्चित केले आहे. 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या क्षेत्रातील फेरीवाल्यांना हे फेरीवाला धोरण अंमलात आणणे गरजेचे आहे. मात्र, लातूर महापालिकेने 2014 मध्ये तीन हजार सहा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून फक्त 300 फेरीवाल्यांनाच नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. महापालिकेने तात्काळ फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करत हातगाडा चालवणा-या कुटुंबीयांची उपासमार थांबवण्याची मागणी या बेमुदत साखळी उपोषण करणाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)