फेरलिलावात तीनच गाळ्यांचा लिलाव

कराडकर नागरिकांनी फिरवली पाठ; गाळ्यांभोवतीची अतिक्रमणे अन्‌ अपुऱ्या सुविधांचा परिणाम

कराड – येथील भाजी मंडईसह अन्य ठिकाणच्या राहिलेल्या 109 गाळ्यांचा शुक्रवारी फेरलिलाव करण्यात आला. परंतु यावेळीही नागरिकांनी पाठ फिरवली. पंधरा दिवसापूर्वीच्या झालेल्या पहिल्या बोलीत 114 पैकी सात गाळ्यांचा लिलाव झाला होता. त्यातील उरलेल्या 107 पैकी केवळ तीन गाळ्यांचा लिलाव आज झाला. मात्र शंभरपेक्षा जास्त गाळ्यांच्या लिलावासाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक उपस्थित होते. त्यामुळे भाजी मंडईतील गाळ्यांसह अन्य गाळ्यांच्या पालिकेच्या लिलावाला नागरीकांचा काहीच प्रतिसाद नाही, असे पुन्हा स्पष्ट झाले. पालिकेने बांधलेल्या गाळ्यांभोवतीची अतिक्रमणे व तेथे सुविधा पुरवण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळेच लिलावात कोणीही सहभागी होत नसल्याची चर्चा रंगली होती.

-Ads-

मुख्याधिकारी यशवंत डांगे, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, वैभव हिंगमीरे यांच्या उपस्थितीत लिलावाची प्रक्रीया पूर्ण जाली. करवसुली अधिकारी उमेश महादार यांनी गाळ्यांच्या लिलावाची बोली केली.
येथील छ. शिवाजी भाजी मंडईत सात वर्षापासून गाळे पडून होते. भाजी मंडईतील नव्या इमारतीच्या काही गाळ्यांची अनामत रक्कम भरली गेली नसल्याने ते बंद अवस्थेत होते.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या गाळ्यांचा लिलाव झाला. एकूण 114 गाळ्यांपैकी सातच गाळ्यांचा त्यावेळी लिलाव झाला होता. इतर गाळ्यांना कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने पंधरा दिवसांच्या फरकाने पुन्हा फेरलिलाव करण्यात आला. मंडईतील 107, आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटरमधील दोन तर सुपर मार्केटमधील तीन हॉलचा फेरलिलाव होता.
मात्र शुक्रवारी झालेल्या या फेरलिलावावेळी मागील वेळेपेक्षा खपूच कमी लोक होते. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक आले होते.

गतवेळच्या लिलावात तेरा जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी तीही संख्या पूर्ण होवू शकली नाही. तरिही पालिकेकडून गाळ्यांचा लिलाव कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन गाळ्यांचा लिलाव झाला. 83 व 69 क्रमांकाच्या गाळ्यास प्रत्येकी एक लाख अकरा हजार तर गाळा क्रमांक 65 ला एक लाख चाळीस हजारांची बोली झाली. तिघांची बोली पूर्ण झाल्यानंतर तेथे कोणीच अन्य लिलावास बोली बोलले नाही. गाळ्यांच्या लिलावासाठी प्रतिसाद न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेथे असणाऱ्या अपुऱ्या सुविधा व अतिक्रमणे ही होय. जोपर्यंत पालिका येथे सुविधा पुरवित नाही तोपर्यंत गाळे पडून राहणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)