फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीची स्वतंत्र फेरी

विद्यार्थ्यांसाठी पुरेश्‍या जागा उपलब्ध
पुणे – दहावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली. 2 सप्टेंबर रोजी रिक्‍त जागांचा तपशील जाहीर झाल्यानंतर या फेरीची घोषणा केली जाणार आहे.
सध्या अकरावीचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीतील प्रवेश सुरु आहेत. त्यानुसार हे प्रवेश 1 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी एकूणच अकरावीच्या शाखानिहाय रिक्‍त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर या नव्याने प्रक्रियेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात येतील असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान पुणे विभागीय मंडळातून एकूण 4 हजार 530 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील साधारण दीड ते दोन हजार विद्यार्थी आहेत. त्या सर्वांसाठी जागा उपलब्ध असल्याचेही राऊत यांनी सांगितले. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाणार नाही याची काळजी आम्ही घेतली असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान अकरावी प्रवेशाच्या तपासणीसाठी 5 भरारी पथके स्थापन करण्यात आली असून सोमवारपासून ही तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)