फेमिनिस्ट असण्यापेक्षा ह्युमनिटेरियन असायला पाहिजे – नंदिता दास

नंदिता दासच्या दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध लेखक शहादत हसन मंटोच्या जीवनावरील “मंटो’ हा सिनेमा 21 सप्टेंबरला येतो आहे. मंटोनी त्यांच्या आयुष्यात इतके विपुल लेखन केले आहे, की त्यापैकी कोणत्या साहित्यावर लक्ष केंद्रीत करायचे आणि प्रेक्षकांसमोर ते कसे मांडायचे हे ठरवण्यासाठी नंदिताला तब्बल 6 महिने मंटोच्या साहित्याचा अभ्यास करायला लागला होता. सिनेमामध्ये मंटोचा रोल नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा कसलेला अभिनेता साकारत असल्यामुळे मंटोच्या व्यक्तिरेखेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याची खात्री होती. पण तरिही मंटोचे चरित्र हा अभ्यासण्याचा एक स्वतंत्र अभ्यास असल्याने नंदिताला या सिनेमासाठी जरा जास्तच कष्ट घ्यायला लागले.

नंदिताची आतापर्यंतची ओळख स्त्रीमुक्‍तीवादी किंवा बंडखोर अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून प्रस्थापित झाली आहे. पण आपल्याला फेमिनिस्ट म्हणण्यापेक्षा ह्युमॅनिटेरियन-मानवतावादी म्हटले तर अधिक योग्य होईल, असे ती म्हणते.
स्त्रियांच्या विषयांवर काम करताना पुरुषांबरोबरची दोस्तीही कायम असायला पाहिजे. पुरुषांना वाईटच म्हणायचे, अशा झापडबंद दृष्टिकोनालाच तिचा विरोध आहे. जर एखादा पुरुष बरोबर असेल आणि स्त्री चुकीची असेल, तर आपण त्या पुरुषाचीच बाजू घेऊ, असे तिने ठामपणे सांगितले. पण आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांबाबत इतक्‍या टोकाची असमानता आहे की स्त्रीला समान दर्जा मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येकालाच थोडेसे फेमिनिस्ट व्हावे लागेल असाच तिचा आग्रह आहे.

नंदिताने दुसरा सिनेमा बनवायला 10 वर्षांचा कालावधी का जाऊ दिला, असे विचारल्यावर आपल्याला काहीही सिद्ध करायची घाई नव्हती. आपले पाय जमिनीवरच राहू द्यायचे होते, असे उत्तर तिने दिले. एक चांगली अॅक्‍ट्रेस आहे म्हणूनच हिंदीऐवजी प्रादेशिक सिनेमांमधूनही तिने काम केले आहे. प्रोफेशनल दृष्टीने तिला खूप पैसे आणि प्रसिद्धी कमवता येऊ शकली असती. पण समाधान तिला तिच्या मोजक्‍या सिनेमांमधील अभिनय आणि दिग्दर्शनातूनच अधिक मिळते आहे. हा परिपक्‍व विचार आपल्याला आपल्या पालकांकडून मिळाला आहे. त्यांनी नेहमीच आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य दिले, म्हणूनच विचारस्वातंत्र्याचा आनंद तिला मिळाला. केवळ रंगरुपामुळे हरखून जाणाऱ्या मुलींना मात्र जगाबरोबरच चालावे लागते. मात्र ती स्वतः सावळी असल्यानेच हटके विचार करण्यास भाग पाडल्याचेही तिने आवर्जुन सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)