फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्‌सऍप प्रयत्नशील 

नवी दिल्ली: “व्हॉट्‌सऍप’च्या माध्यमातून बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी देशांतर्गत एक स्थानिक पथक तयार करण्यात आले आहे. मात्र मेसेज मूळचा कोणाचा आहे, हे अद्याप ओळखता आलेले नाही, असे व्हॉटस ऍपच्यावतीने आज सरकारला सांगण्यात आले. “फेकन्यूज’च्या प्रसारामुळे जनक्षोभ उसळण्याबाबत गेल्या काही महिन्यांबाबत व्हॉट्‌स ऍप’ला जबाबदार धरले जाऊ लागले आहे. त्यावरून सरकारने “व्हॉट्‌स ऍप’ला नोटीस बजावली होती. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये “व्हॉट्‌स ऍप’ने ही माहिती दिली असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बनावट बातम्या रोखण्यासाठी देशांतर्गत पथक तयार करण्यात येत असून मेसेजचा मूळ शोधण्याची सरकारची प्रमुख मागणी अद्याप साध्य करता आलेली नाही. यासाठी भारतात दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना नियुक्‍त करण्यात येणार आहेत. मेसेजचे मूळ उघड केल्यास त्यातील गोपनीयता धोक्‍यात येऊ शकते. तसेच मेसेजचा गैरवापरही केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने सुधारणा करण्यावर आपला भर आहे, असेही “व्हॉट्‌स ऍप’ने म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)