‘फेक न्यूज’ प्रकरणी न्यूज पोर्टलचा संपादक अटकेत

बेंगळुरू: ‘फेक न्यूज’ देऊन दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या एका न्यूज पोर्टलच्या संपादकाला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. महेश हेगडे असे या संपादकाचे नाव असून त्याच्या अटकेवरून भाजप, काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे.

न्यूज पोर्टलवरून मुस्लिम तरुणांनी एका जैन मुनींवर हल्ला केल्याची बातमी दिली होती. जखमी मुनींचा फोटोही बातमीसोबत अपलोड केला होता. प्रत्यक्षात हे मुनी एका अपघातात जखमी झाले होते. मात्र, ते हल्ल्यात जखमी झाल्याचे बातमीत म्हटलं होतं. ही माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तात्काळ हालचाली करून आज हेगडे याला अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)