फॅमिली अपिलीय बेंच सुरू करण्याची मागणी – दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने दिल्लीत दिले निवेदन

पुणे- कौटुंबीक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात शहरात अपील करता यावे, यासाठी येथे फॅमिली अपिलीय बेंच सुरू करण्याची मागणी दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या विविध मत्रालयांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दिल्ली येथे जावून नुकतेच सर्वोच्च न्यायालय आणि विविध मंत्रालयांना दिल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणी आणि माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांनी दिली.

कौटुंबीक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अपील, रिव्हिजन, रिटपिटीशन दाखल करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला थेट मुंबई उच्च न्यायालयातच आवाहन द्यावे लागते. मुंबई येथे जाण्यास पैसा, वेळ खर्च होतोच. परंतु, लवकर न्याय मिळण्याची श्‍वाश्‍वती देता येत नाही. देशातील प्रत्येक राज्यात असे दावे, रिव्हीजन लाखोंच्या संख्येने प्रलंबीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कौटुंबिक न्यायालयातील दाव्यांकडे आता वेगळ्या पध्दतीने पाहण्याची आवश्‍यकता आहे. येथील दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अशा पद्धतीने अपिलीय बेंच सुरू आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचेल, असे त्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. याविषयी गणेश कवडे म्हणाले, कौटुंबीक हिंसाचार कायद्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाविरोधात सध्या सत्र न्यायालयाकडे अपील करावे लागते. याचे अधिकार या बेंचला दिल्यास त्याचा पक्षकारांना फायदा होईल. दावे लवकर निकाली निघतील. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अपील करणेही सोपे बनेल.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)