फॅन फॉलोविंगचे सोशल फंडे

बॉलिवूड स्टार म्हटले की त्यांच्याबाबत एक वेगळ वलय सर्वसामान्यांमध्ये निर्माण होते. एखादा सिने-अभिनेता,अभिनेत्री पसंत असेल अथवा एखाद्या सिनेमातून झोतात आलेल्या कलाकारांच्या अभिनयाबाबत, ग्लॅमरबाबत जितकी चर्चा होते,तितकीच त्यांच्या फॅन फॉलोविंगबाबतही चर्चा होत असती. ट्‌विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे सोशल मिडिया माध्यमवरील चाहते असोत, की एखाद्या कलाकाराच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर तासनतास उभे असणारे चाहते असोत. सिनेकलाकारांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबिर, अंध-गरजू मुलांना जीवनाश्‍यक वस्तूंचे वाटप, वृद्धांची मदत अशी सामाजिक कार्ये करत फॅन फॉलोविंगचा एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.

सेलिब्रिटींचे फॅन म्हटले की त्यांच्यासारखी वेशभूषा धारण करणे, त्यांच्या आवाजाची, अभिनयाची नक्कल करणे, त्यांच्या पसंतीच्या वस्तू गोळा करणे, भेटकार्ड, पत्र पाठवून आपले प्रेम व्यक्त करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र आपल्या आवडत्या कलाकाराबाबत प्रेम व्यक्त करण्यासाठी शहरातील ओंकार येवले, स्वरूप पांडे आणि विश्‍वनाथ कोनका तरूणांनी एकत्र येऊन नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे साडेसात लिटर रक्ताचे संकलन करून ते रक्‍त्यपेढीच्या स्वाधीन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत स्वरूप पांडे म्हणाला,”तेलुगू अभिनेता प्रभास याचे आम्ही चाहते आहोत. 23 ऑक्‍टोबर रोजी प्रभासचा वाढदिवस असतो. माझ्यावर प्रेम करत असाल तर समाजातील जास्तीत जास्त गरजू लोकांची मदत करा, असे तो वारऽवार सांगत असतो. आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रती प्रेअम व्यक्त करण्यासाठीच आम्ही विबिध सामाजिक उपक्रम राबवत असतो.”

असाच एक उपक्रम शहरातील आणखी काही तरूणांकडून राबविला जातो. हे तरूण स्वत:ला आमिर खान’चे फॅन म्हणवतात. तसेच प्रत्येक वीकेंड’ला शहराजवळच्या गावांमध्ये जाऊन तेथील शालेय मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक, पर्यावरणविषयक अभ्यासाचे धडे देतात. आम्ही हे काम आमच्य लाडक्‍या अभिनेत्याबाबत प्रेम व्यक्त करण्यासाठी करत आहोत. लवकरच त्याची भेट देखील घेणार आहोत. असेही त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

– गायत्री वाजपेयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)