फॅट टू फिट !!!

जगातील सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे स्वतःला तंदुरुस्त (म्हणजे “फिट’!) ठेवणे. मात्र, अनेकांचा जीभेवर ताबा नसतोच. केवळ वाचाळपणाबाबतच नव्हे, तर त्यांची जीभ वाट्टेल ते चटकमटक खाण्याबद्दलही मोकाट सुटलेली असते. अशा वेळी कंबरेची टायर कधी झाली हे कळत नाही. वजन वाढल्यावर ते घटवण्यासाठीही अनेक लोक कंटाळा करतात किंवा आरंभशुरांसारखे प्रयत्नांना सुरुवात करून नंतर ते सोडून देतात. आता अशा लोकांना एक जोडपे प्रेरणा देत आहे. हे जोडपे असेच गलेलठ्ठ होते. मात्र, दोघांनी ठरवून मेहनत घेतली आणि आता हे दोघेही अधिक फिट आणि सुंदर बनले आहेत. लेक्‍सी रीड आणि तिचा पती डॅनी यांची ही “फॅट टू फिट’ कहाणी आहे.

काही महिन्यांपर्यंत लेक्‍सीचे वजन 485 पौंड आणि डॅनीचे 280 पौंड होते. वाढलेले वजन घटवण्याचे दोघांनीही मनापासून ठरवले आणि त्यासाठी मेहनत घेणे सुरू केले. लेक्‍सीने अठरा महिन्यांमध्ये 400 पौंड वजन घटवले आणि आता ती अतिशय सुंदर दिसू लागली आहे. डॅनीनेही आपले वजन निम्म्यापेक्षा अधिक घटवून दाखवले. दोघांनीही आहारावर नियंत्रण ठेवले होते. आठवड्यातून किमान पाच ते सहा वेळा जीममध्ये जाऊन ते घाम गाळत होते. दोघेही आता अधिक तरुण आणि उत्साही दिसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)