फॅटी लिव्हर मधुमेही त्रस्त(भाग ३)

फॅटी लिव्हर मधुमेही त्रस्त(भाग २)

आहार निरोगी शरीरासाठी
घरातील पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर स्वयंपाक करताना थकवा येत असल्यामुळे तयार आणि रेडी-टू-ईट पदार्थावर अधिक भर देण्यात येतो. एकल किंवा विवाहित, जे बाहेरील पदार्थावर अवलंबून आहेत, त्यांना आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात भेडसावू शकतात.

तुम्हाला ट्रान्सफॅटबद्दल माहिती आहे का? तुम्ही सेवन करत असलेल्या बहुतेक पदार्थामध्ये ट्रान्सफॅट असतात, जे आरोग्यासाठी अपायकारक असतात. ट्रान्सफॅटमुळे हृदयविकार आणि मधुमेह जडण्याचे प्रमाण वाढते असे संशोधनाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅट हे हायड्रोजनित फॅट्‌स (चरबी) असतात.
चरबीच्या पेशी या कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळीने दुहेरी बंधांतून गुंफले गेलेले असतात. हायड्रोजनित चरबीमध्ये तळलेले पदार्थ अधिक काळ टिकतात, ते अधिक कुरकुरीत होतात आणि तुपाच्या तुलनेने स्वस्त असतात. त्यामुळे डालडा पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिढीचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. घरात, खानपानसेवा केंद्रांमध्ये आणि बेकरीमध्ये त्याचा मुबलक प्रमाणात वापर करतात.

वेफर, कुकीज, बिस्किटे, केक, पिझ्झा, मेवामिठाई, नमकीन आणि इतर चमचमीत पदार्थामध्ये ट्रान्सफॅट असतात. व्यावसायिक पातळीवर तयार करण्यात येणा-या बहुतेक पदार्थामध्ये ट्रान्सफॅट कमी-अधिक प्रमाणात असतात. हायड्रोजनित वनस्पती तेल, प्रक्रिया केलेले अन्न, प्रि-मिक्‍स्ड पदार्थ, प्रि-मिक्‍स्ड चिकन, गोठवलेले पदार्थ, मायक्रोवेव्ह पदार्थ, पाव आणि रेडी-टू-ईट (तयार पदार्थ) यामध्ये ट्रान्स फॅट असतात.

संशोधनात असे आढळून आले आहे की, भारतीयांच्या शरीरात साचणारे 80% ट्रान्स फॅट रस्त्यावरील खाद्यपदार्थामधून जमा झालेले असतात. म्हणजेच चाट, सामोसे, जिलबी, भजी विकणारे खाद्यपदार्थ विक्रेते ट्रान्सफॅट खाऊ घालत असतात. पदार्थ तळण्यासाठी ते वनस्पती तेलांचा वापर करतात. तंदुरी रोटी आणि नानसाठीसुद्धा वनस्पती तेलच वापरतात.
त्यामुळे तुम्ही पदार्थासाठी शॉर्ट कट वापरता किंवा तुमच्या मुलांच्या फास्ट फूडच्या मागण्या पूर्ण करता तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी धोका ओढवून घेत आहात, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आठव्या-नवव्या वर्षी कोलेस्टरॉल, मधुमेह आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे वाढलेले प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे. पालक म्हणून आपल्यासाठीही ही चिंतेचीच बाब आहे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)