फॅटी जामुन

घटक : 20-25 नग, 1 1/2 कप साखर, 1 1/2 कप पाणी, केशर/केसराच्या काही काड्या, 3 दालचिनिची पावडर, 1 चमचा लिंबाचा रस, 1 कप इन्स्टंट गुलाब जाम मिक्‍स, 3 टेबलस्पून कोमट दूध, तेल/तुप -तळण्याकरिता.

सजावटीसाठी : 1 कप मावा, 1 कप साखर, 1 टीस्पून दालचिनी पावडर, 1 कप दूध, काही डाळिंबाचे दाणे.

पध्दत : सुरुवातीला एका मोठ्या भांड्यात दीड कप साखर आणि दीड कप साखर घ्यावी. त्यामध्ये काही केशर/केसरच्या काड्या घालाव्या आणि त्याला एक उकळी काढावी. ते मिश्रण 4 मिनिटे स्थिर होऊ द्यावे किंवा त्यामधील साखरेचा पाक किंचित चिकट होईपर्यंत ठेवावा.

गॅस बंद करावा आणि त्यामध्ये दालचिनीची पावडर आणि लिंबू रस घालावा. साखरेचा पाक आता तयार झाला आहे. एका मिश्रण करण्याच्या बाउल मध्ये 1 कप तयार गुलाबजाम मिक्‍स घ्यावे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून कोमट दूध घालावे आणि एकत्र करुन एक मऊ आणि गुळगुळीत पिठाचा गोळा करावा.

त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून छोटेछोटे गोळे करावे. त्या गोळ्यांना भेगा पडल्या नाहीत याची खात्री करुन घ्यावी. मंद गॅस वर तूप गरम करुन घ्यावे, मध्यम तपमानाचे असावे,त्यामध्ये गुलाबजाम तळून घ्यावे. मंद आंचेवर ठेवून ते गोळे थोडया थोड्या वेळाने हळू हळू हलवावे. हे गोळे सोनेरी तपकीरी रंगाचे होईपर्यंत तळावे. त्याचे तुप ओघळून गेल्यावर ते बाजूला ठेवावे. ताबडतोब ते गरम गुलाबजाम गरम साखरेच्या पाकात सोडावे. झाकण लावून 30 मिनिटे ते 2 तास पर्यंत ठेवावे. तुम्हाला असे दिसून येईल की ते दुप्पट आकाराचे झालेले आहेत.

एक जाड बुडाचे पातेले घ्यावे आणि सजावटीसाठी दिलेले सर्व घटक (डाळिंबाचे दाणे वगळून) एकत्र करावे. घट्ट गुळगुळीत क्रीम तयार होईपर्यंत ते शिजवून घ्यावे.

वाढण्यापूर्वी गुलाबजाम अर्धे कापून त्यावर दाट क्रीम लावून डाळींबाचे दाणे लावून सजवावे.

– शेफ केशोब जाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)