फूल बाजारातील वाहतुक कोंडींचा प्रश्‍न सुटला

बाजार समितीच्या नवीन नियमावलीचा वापर करण्यास सुरूवात

पुणे – मार्केट यार्डातील फूल, भुसार विभागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबर आवाराला शिस्त लावण्यासाठी बाजार समितीने केलेल्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात सुरूवात झाली. फूल विभागात नवीन नियमावलीच्या पहिल्याच दिवशी वाहतुक कोंडीसह इतर समस्या सोडविण्यात बाजार समितीला यश आले आहे. फुल विभागाने मोकळा श्‍वास घेतला आहे. भुसार बाजारातीलही काही अडचणी सोडविण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी बी.जे.देशमुख यांनी बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर फळे, भाजीपाला विभागातील बाजार घटकांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे वाहतुक कोंडीसह अनेक समस्या सुटल्या आहेत. मागील 15 दिवसांपासून फळे, भाजीपाला विभाग सुटसुटीत बनला आहे. त्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा फूल, भुसार विभागाकडे वळविला आहे. तेथील बाजार घटकांशी चर्चा करून नवीन नियम तयार केले. गुरूवारपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी वाहतुक कोंडी लक्षणीयरित्या कमी झाली. दुपारी दीड वाजेपर्यंतच फुलांची विक्री करण्यात आली. बाजारातील आडत्यांनी त्यांचा माल गाळ्यावरच लावला होता तसेच आखून दिलेल्या सीमारेषेतच विक्री केली. तसेच, फुलांची खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर गाळ्यासमोर शेतमाल घेवून आलेली वाहने शेतीमाल खाली करून तात्काळ बाहेर काढण्यात आली. दरम्यान कोठेही बेकायदेशीर पार्किंग करण्यात आले नाही. वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. प्रशासनाकडून 18 प्रकारचे
नियम बाजार समितीच्या वतीने घालून देण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. दरम्यान भुसार विभागाची बी.जे.देशमुख पाहणी केली. तेथील प्रश्‍नही काही दिवसात सुटतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी फूल बाजारात केवळ एका आडत्यारच कारवाई
फूल बाजारात पहिल्या दिवशी केवळ एका आडत्यानेच नवीन नियमावलीतील नियमाचे उल्लंघन केले. ठरवून दिलेल्या जागेच्या बाहेर त्या आडत्याने माल ठेवला होता. त्यामुळे त्याच्यावर बाजार समिती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. अडीच हजार रुपये दंड त्याच्याकडून वसुल करण्यात आला. त्यामुळे लवकर फूल बाजारात शिस्त लागेल, असे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)