फूड फेस्टिव्हलमध्ये एक लाख रुपयांची उलाढाल

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे आयोजन

मंचर- येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये पाणी-पुरी, भेळ, मसाला दूध, आईस्क्रिम, मासवडी, वडापाव, बिर्याणी आदी 50 स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. यामध्ये एक लाख रुपयापेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे.
वाणिज्य विभागा अंतर्गत वाणिज्य महोत्सव 2019 अंतर्गत ट्रेड फेअर या उपक्रमाबाबत प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे, या दृष्टीकोणातून विविध खाद्यपदार्था बरोबरच पुस्तके, स्टेशनरी, दुग्धजन्य पदार्थ, हॉटेल व्यवसायिक या दृष्टीने स्टॉलची मांडणी या उपक्रमामध्ये केली होती. फेस्टिव्हलचे उद्‌घाटन मोरडे फुड्‌सचे मदन देशपांडे आणि प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यावसायिक खरेदी-विक्री व नफा या सर्वांचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा उद्देश्‍य डोळ्यासमोर ठेवून मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी दिली.
यावेळी राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, उद्योजक अजय घुले, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. बी. कल्हापुरे, एस. एस. उघडे उपस्थित होते. विद्यार्थी कुणाल वळसे पाटील, सागर वाघमारे, रोहित शिंदे, अश्‍विनी आढळराव, ऋतुजा टाव्हरे, ऋतुजा वळसे, शामल वळसे, रोहिणी ढोबळे, निकीता शेटे, निलिमा हिंगे यांनी व्यवस्था पाहिली. विद्यार्थ्यांना विविध पदार्थाची निर्मिती, विक्री कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. दोन हजार विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हलला भेट दिल्याची माहिती विद्यार्थी कुणाल वळसे पाटील यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)