पिंपरी- फुल विक्रेत्यांनी वजनकाटा, मापे, हिशेब वही व दुकानाची मनोभावे पारंपरिक पद्धतीने पूजा करून घबाड षष्टी शगुन चौकात मोठ्या उत्साहात आज साजरी केली. व्यवसायात वृद्धी व्हावी, याकरिता दिवाळीनंतरची षष्टी फुल विक्रेते घबाड षष्टी म्हणून साजरी करतात. आज सकाळपासूनच फुल विक्रीचे व्यवहार बंद होते, मात्र उत्तर भारतीयांच्या छठ् पूजेसाठी फुलांची किरकोळ विक्री सुरू होती. फुल विक्रेते आणि उत्पादक यांच्यात वर्षभर खरेदी-विक्री व्यवहारात हजारो रुपयांची उलाढाल होते. विक्रेत्यांकडील देणी बाकी घबाड षष्टीला शेतकऱ्यांना चुकती करण्यात आली. शेतकरी आणि दुकानातील कामगारांना मिठाईचे वाटप झाले. तसेच कामगारांना भेटवस्तू देऊन विक्रेत्यांनी सत्कार केला.
सप्तश्रृंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर, राजकुमार मोरे, शिवाजी सस्ते, बाबा रासकर, बाबा तापकीर, प्रणित बडवे, शाम लांडगे, विकास जाधव, धनाजी सोनवणे, संजय बोडके, ज्ञानेश्वर केमसे, विक्रेते व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा