भोसरी – येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील मुलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत महिला व बाल कल्याण समिती मार्फत आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि खेळणीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ब्लॉक गेम, पझल, लेटर आणि नंबर अशा विविध प्रकारच्या खेळणीचे समावेश आहे.

लांडेवाडीतील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या प्रा. सोनाली गव्हाणे, ई प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, दत्ता गव्हाणे, छाया शिंदे, अहिल्या जाधव आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत महिला व बाल कल्याण समिती मार्फत विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. खेळणीच्या साहित्यांमुळे मुलांच्या बुद्धिमतेला चालना मिळेल. त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती वाढीस लागेल. खेळातून सांघिक भावनेचा विकास होईल. खेळणीच्या साहित्यांमुळे मुलांच्या बुद्धिमतेला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)