फुले रंगमंदिराच्या स्वच्छतेवर 65 लाखांचा खर्च

पिंपरी – पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिराची स्वच्छता अत्याधुनिक उपकरणे, रसायन, मनुष्यबळाबरोबरच यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 65 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत आयत्यावेळी या प्रस्तावास विनाचर्चा मंजुरी दिली. प्रख्यात दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या नावाने महापालिकेने पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले रंगमंदिर उभारले आहे. सुमारे 3502 चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या रंगमंदिरची आसन क्षमता बाल्कनीसह 613 इतकी आहे. या रंगमंदिर उभारणीसाठी 23 कोटी 85 लाख रुपये खर्च आला आहे. तर शिल्लक राहिलेल्या विद्युत आणि साउंड सिस्टमच्या कामासाठी महापालिकेतर्फे 86 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातूनच अत्याधुनिक पद्धतीची ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रंगमंदिराचे उद्‌घाटन होवून एक वर्ष होत नाही तोच त्यावर खर्चाची उधळपट्टी सुरु झाली आहे. इमारत, कॉरिडॉर आणि अंतर्गत व बाह्य परिसराची साफसफाई व स्वच्छता ठेकेदारामार्फत करून घेण्यात येणार आहे. अत्याधुनिक उपकरणे, साधने, विविध प्रकारचे रसायन, मनुष्यबळ तसेच यांत्रिकी पद्धतीचा त्यासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी 64 लाख 73 हजार 568 रुपये अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी भाग घेतला. त्यापैकी मेसर्स शुभम उद्योग या ठेकेदाराची 14.75 टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)