फुले दाम्पत्याला भव्य रॅलीद्वारे अभिवादन

पुणे – आकर्षकरित्या सजविलेले रथ…लेझिम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यांच्या साथीने फुले विचारांचे फलक हाती घेत मंगळवारी भव्य रॅली आयोजित करण्यात आली. या माध्यमातून फुले दाम्पत्याला अभिवादन करण्यात आले. माळी महासंघाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दि. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यामुळे दि. 1 जानेवारी हा दिवस “फुले दाम्पत्य सन्मान दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यानिमित्त ही रॅली काढण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अखिल भारतीय माळी महसंघाचे अध्यक्ष गोविंद डाके, महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, समाज प्रमुख जगन्नाथ लडकत, समाज प्रमुख राजाभाऊ रायकर, काळुराम उर्फ अण्णा गायकवाड, शहर संयोजक अश्‍विन गिरमे, पश्‍चिम महाराष्ट्राचे संयोजक अतुल क्षीरसागर, जिल्हा संयोजक चंद्रशेखर दरवडे, प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, महात्मा फुले मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रमुख हनुमंत माळी, रेखा रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोष लोंढे आदी उपस्थित होते. भिडे वाडा येथून या रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, गंजपेठ पोलीस चौकी मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे ती विसर्जित करण्यात आली. यावेळी अविनाश ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)