फुलेंच्या चित्रपटासाठी तज्ज्ञांची समिती

मुंबई – थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

या समितीत सदस्य म्हणून रमेश पतंगे, गिरीश प्रभूणे, सदानंद मोरे, हरि नरके आणि दत्ता भगत यांचा समावेश करण्यात आला आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती, वृत्त व जनसंपर्क) हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी शासन आदेश जारी केला. राज्य मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 2018 च्या बैठकीत महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता.

आता सरकारने समिती गठीत करून समितीवर चित्रपटाची संहिता, पटकथा प्रमाणित करणे, चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याची खात्री करणे, निर्मिती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे, अशी जबाबदारी सोपवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)