फुलसुंदर यांचे कार्य प्रेरणादायी -सोनवणे

नारायणगाव-शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग योगदान असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाखा हिवरे खुर्द या शाळेतील मुख्याध्यापिका सुशीला प्रभाकर फुलसुंदर यांचे कार्य इतर शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्‌गार आमदार शरद सोनवणे यांनी ओझर येथे काढले.
शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ हिवरे खुर्द यांच्या वतीने मुख्याध्यापिका फुलसुंदर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ओझर येथील भक्‍तभवन क्र.1 येथे नुकताच झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे हे होते. याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, कांदळीचे उपसरपंच नारायण भोर, शांताराम घाडगे, हिवरे खुर्दचे सरपंच कैलास जाधव, माजी सभापती पंचायत समिती संगिता वाघ, पं.स.सदस्य दिलीप गांजाळे, धर्मवीर पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर कोल्हे, जेष्ठ नागरीक संघ नारायणगावचे उपाध्यक्ष चंद्रचुड कोल्हे, बाळसाहेब कानडे व रामभाऊ सातपुते, सुशीला डुंबरे, तालुका शिक्षक संघ अध्यक्ष उपेंद्र डुंबरे, तालुका जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन वायकर, सुत्रसंचलन सुनिता वामन व रूपेश फुलसुंदर यांनी केले. निलेश किसन औटी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)