फुलपाखरांच्या फोटो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा- येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. श्रीराम भाकरे व आंबोली येथील हेमंत ओगले यांनी पश्‍चिम घाटातील फुलपाखरांच्या प्रजातींचा अभ्यास करुन माहितीपूर्णं असे पुस्तक लिहीले आहे या पुस्तक प्रकाशनाचे औचित्य साधुन येथील कन्याशाळेत फुलपाखरांच्या फोटोंचे सुरेख प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सातारा येथील ड्रोंगो, रानवाटा आणि रोटरी क्‍लब ऑफ सातारा यांचेवतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी केवळ सातारकरच नव्हे तर अनेक परजिल्ह्यातूनही आज पहिल्या दिवशी निसर्गप्रेमी आणि फुलपाखरु प्रेमींनी गर्दी केली होती. हे प्रदर्शन दि. 20 ऑगस्ट सायंकाळी आठपर्यंत सुरु रहाणार आहे. तसेच हे प्रदर्शन विनामूल्य पहाता येणार आहे.

या दोन्ही संयोजकांनी लिहीलेल्या अ गाईड टू द बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्नं घाट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष व प्रसिध्द निसर्गतज्ञ विलास बर्डेकर यांचे हस्ते संपन्न झाला. फुलपाखरांचे जीवनचक या विषयावरील हे सखोल माहितीपुर्ण पुस्तक आणि आयोजित केलेले प्रदर्शन हे बहुधा संपुर्ण भारतातील पहिलेच पुस्तक आणि प्रदर्शन असावे असे मत अनेक जाणकारांनी यावेळी व्यक्त केले. या प्रदर्शनात आपल्या भागात आणि पश्‍चिम घाट परिसरात आढळणाऱ्या हजारो फुलपाखरांच्या जीवनशैली आणि रंगसंगतींचे चित्रण गेली 10 वर्षे मेहनत घेउन डॉ. भाकरे यांनी केले आहे. यातील सिलेक्‍टेड 125 फोटोंना या प्रदर्शनात स्थान देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुलपाखरांचा अभ्यास करताना डॉ. भाकरे यांनी संपुर्ण काश्‍मिर, प. बंगाल, ओरिसा तसेच सेव्हन सिस्टर्स या प्रदेशांतील फुलपाखरांचा अभ्यास करुन ही फोटोग्राफी केली आहे. फुलपाखरांच्या जीवनातील अंडी, अळी, कोष आणि या कोशाचे फुलपाखरात रुपांतर कसे होते हे दाखवणारा हा जीवनप्रवास या प्रदर्शनात आपणास पहायला मिळत आहे. या प्रदर्शनास आपण सर्व सातारकरांनी अवश्‍य भेट द्यावी असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)