फुरसुंगी व ऊरुळी देवाचीत गायरानावर कब्जा

महादेव जाधव 

पालिकेत समावेश झाल्यानंतर जागा विक्रीचा धंदा जोरात


प्रशासनाचे नियोजन कुचकामी

फुरसुंगी- फुरसुंगी व ऊरुळी देवाची गावांचा गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या जागा कवडीमोल भावाने बळकवण्यासाठी लहान – मोठे बिल्डर लॉबी पुढे सरसावल्याचे दिसत आहेत. त्याचबरोबर या भागातील सरकारी व गायरान जमिनींवर ताबा घालून जागा विकण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात विविध विकासकामे, योजना व उपक्रम राबविण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासानाने तत्काळ या भागाचे योग्य नियोजन करुन जागा बळकावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची गावांचा ऑक्‍टोबर 2017 मध्ये पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला मोठे महत्त्व आले आहे. भविष्यात विकासाच्यादृष्टीने ही गावे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे या भागाकडे सर्वांचाच ओढा लागला आहे.या दोन्ही गावांमध्ये शेती जास्त प्रमाणात असल्याने शहराच्या मानाने या भागातील जागांचे भाव कमी आहेत. जागांचे बाजार वाढण्याअगोदरच शेतकरी व लहान – मोठे जागामालक यांना वेगवेगळी प्रलोभने, आमिषे प्रसंगी दंडेलशाही व आरक्षणाची भीती दाखवून लहान – मोठ्या बिल्डरांकडून येथील जागा कवडीमोल भावाने लाटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.

या गावांसाठी पालिकेने प्रशासकीय अधिकारी नेमले असून या भागात पालिकेची निवडणूक अजून झालेली नसल्याने लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेत अनेकजण या जागा बळकावून इमारती उभ्या करून मालामाल होत आहेत. ही बांधकामे पीएमआरडीए वा पालिकेची परवानगी न घेता बिनदिक्‍कतपणे बांधून विकण्याचा धंदा जोमाने सुरू आहे. याकडे पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. स्वत:च्या स्वार्थामुळे बिल्डरांच्या या कृत्यामुळे पुणे शहराचा भकासपणा दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेच्या मुलभूत नागरी सुविधा मिळतील सांगून चढ्याभावाने अनधिकृत सदनिका विकल्या जात आहेत. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहेत.

या परिसरात बिल्डरांबरोबर जागा माफियाही पुढे सरसावले आहेत. महाराष्ट व इतर राज्यातून रोजगारासाठी पुणे शहरात येणाऱ्या गोरगरीब लोकांची जागेमध्ये मोठी फसवणूक होताना दिसत आहे. एकच जागा अनेकांना विकल्याचे प्रकार घडत आहेत. या इस्टेट एजंटकडून आठशे ते नऊशे स्क्‍वेअर फुटचा गुंठा विकला जात असल्यामुळे सात-बारा उतारा करताना अडचणी येत आहेत.त्यामुळे फुरसुंगी व उरुळी देवाची परिसरात जागा माफियामुळे या भागात नवी झोपडपट्टी होण्यापासून रोखणे कठीण जाणार आहेत. या गंभीर समस्येबाबत प्रशासनाने त्वरीत लक्ष न घातल्यास भविष्यात पुणे महानगरपालिकेला पायाभूत सुविधा पुरवताना व विकासाच्या योजना राबवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)