फुरसुंगी येथे उद्या निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा

संग्रहित छायाचित्र

 महाराष्ट्र, दिल्ली व हरियाणातील मल्लांमध्ये कुस्ती

पुणे  – समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेला 100 वर्षापेक्षा मोठी परंपरा असून महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्या शनिवार, दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शिवशंभो स्टेडियम फुरसुंगी येथे या निकाली कुस्त्या रंगणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण 26 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हरियाणाचा हिंदकेसरी परवेश मान, कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुजर, दिल्लीचा हितेश कुमार विरुद्ध कोल्हापूरचा बालारफीक शेख या कुस्त्या विशेष आकर्षण असणार आहेत. या कुस्त्यांमधील विजेत्या पैलवानांना चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

याशिवाय पुण्याचा कौतुक डाफळे विरुद्ध दिल्लीचा प्रवीण भोला, पुण्याचा साईनाथ रानवडे विरुद्ध गणेश जगताप, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव विरुद्ध सचिन येलभर या नामवंत मल्लांमध्ये कुस्त्या होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. यानिमित्ताने देशातील तगडया मल्लांचे मल्लयुद्ध अनुभविण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण 66 कुस्त्या या महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांत वादळ निर्माण करणाऱ्या मल्लांच्या होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)