फुरसंगी येथे रविवारी महायोजना शिबिर

पुणे- गरजुंना एकाच ठिकाणी सरकारी योजनांची माहिती, अर्ज भरण्याची सोय, आवश्‍यक कागदपत्रांची उपलब्धता आणि अर्ज स्विकारण्याची सोय करण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे फुरसंगी येथे रविवारी (दि.25 मार्च) महायोजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर आणि फुरसुंगी भागांतील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, आदर्शनगर, फुरसुंगी येथे होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले आहे. यात रेशन कार्ड, महिला सक्षमीकरण योजना, व्यवसाय प्रशिक्षण योजना, बालसंगोपन योजना, घरेलु कामगार नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी, माझी कन्या भाग्यश्री योजना, संजय गांधी निराधार योजना आणि व्यवसायासाठी कर्ज योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. योजनांचा अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला काढण्याची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शिबिराच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक – 020 – 65221075 असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)